Tuesday, April 14, 2015

दिन विशेष - १४ एप्रिल

भीमराव रामजी आंबेडकर

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार

जन्मदिन : एप्रिल १४, इ.स. १८९१


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर (एप्रिल १४, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - डिसेंबर ६, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. [२].[३]./[४] भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.

सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष

बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.

चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.

पुरस्कार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात.त्यांपैकी काही असे:-

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’
फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने दिला गेलेला समाजरत्‍न पुरस्कार
बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार(नागपूर)
महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

Monday, April 13, 2015

दिन विशेष - १३ एप्रिल

दत्ताजी ताम्हाणे

एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक

जन्म : रत्नागिरी, १३ एप्रिल, १९१३



दत्ताजी ताम्हणे (जन्म : रत्नागिरी, १३ एप्रिल, १९१३; मृत्यू : मुलुंड (मुंबई), ६ एप्रिल २०१४) हे एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे वडील पोस्ट मास्टर होते. त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे १३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला हत्याकांड झाले. त्यामुळे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दत्ताजींनी आपला वाढदिवस साजरा केला नाही.

शालेय वयात असताना दत्ताजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तिपर कविता म्हणत. अशी एक कविता ऐकून एका पोलीस अधिकाऱ्याने पोस्ट मास्टरची मुले देशद्रोही आहेत, असा रिपोर्ट दिला. तेव्हा एका रात्रीत त्या कवितेच्याच चालीवर राजा पंचम जॉर्जची स्तुती करणारी कविता रचून दत्ताजींच्या वडिलांनी कुटुंबावरील संकट टाळले.

विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्यप्रेम उफाळून आल्यामुळे १९२८ साली सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याच्या घटनेने त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मिठाच्या सत्याग्रहासाठी आंदोलन केले.

१९३२मध्ये दत्ताजींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कॉलेजात प्रवेश घेतला. पण कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी १९३४ सालापासून काँग्रेसचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास प्रारंभ केला. १९३६मध्ये फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास दत्ताजींची उपस्थिती होती.

त्यानंतर, स्वामी आनंद यांच्या आश्रमात जवळ जवळ दोन वर्षे दत्ताजींचे वास्तव्य होते. १९४०साली ठाणे जिल्‍ह्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्यामुळे १९४२ साली दत्ताजींना सव्वा दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला. या आंदोलनात ठाण्याच्या तुरुंगात आणले गेलेले ते पहिले राजबंदी होते.

स्वातंत्र्यानंतर सन १९४८मध्ये दत्ताजींनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. १९५० ते १९५३पर्यंत समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.

१९५२साली दत्ताजी ताम्हणे यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे १९५७साली विधानसभेवर त्यांची निवड झाली. 1968 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात, १९७५मध्ये १८ महिनेे तुरुंगात राहण्याची पाळी दत्ताजींवर आली.

दत्ताजी ताम्हणे यांनी `लोकमित्र' हे साप्ताहिक संपादित केले. कुळकायद्यावर त्यांनी `कळीचा घोडा' हे पुस्तक लिहिले. त्यास महाराष्ट्र शासनाचा १५०० रुपयांचा पुरस्कार मिळाला. १९६८ साली ताम्हणे लोकसभेसाठी उभे राहिले परंतु त्यांचा पराभव झाला.

१९७६मध्ये दत्ताजी ताम्हणे यांनी ठाणे जिह्यामध्ये जनता पक्षाची स्थापना केली. १९८३साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी त्यांचा लेखन वाचन व चिंतन हा छंद आणि समाजकारण व मार्गदर्शन हेच व्रत सांभाळले. ते १०० वर्षांचे झाले तरी त्यांच्या घरी सकाळी १०-१५ माणसे केवळ विविध पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नित्यनेमाने जमत असत.

दत्ताजी ताम्हणे यांनी लग्न न करता आयुष्यभर देशकारण आणि समाजकारण केले. वयाच्या १०१व्या वर्षी दीड महिन्याच्या आजारपणानंतर त्यांचे मुंबईतील मुलुंडच्या रुग्णालयात निधन झाले.

Friday, April 10, 2015

दिन विशे‍ष - ११ एप्रिल

जोतीराव गोविंदराव फुले

मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक

जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७


महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.


वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’

मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.

Thursday, April 2, 2015

दिन विशेष - २ एप्रिल

Erastus Brigham Bigelow

American inventor of weaving machines

Born - April 2, 1814


Erastus Brigham Bigelow (April 2, 1814 – December 6, 1879) was an American inventor of weaving machines.

Beginnings
Erastus Bigelow was born in West Boylston, Massachusetts. He was the son of a cotton weaver, and it was his parents' desire that he should become a physician, but, his father's business not being successful, he was unable to continue his studies, and so turned his attention to inventing.[1] He showed an inventive genius at the early age of 14, when he invented a machine to manufacture piping cord, for which he received $100. Before he had reached the age of 18, he had devised a handloom for suspender webbing. His work on Stenography, a short manual on shorthand writing, was written and published about this time.[1] In 1838, he invented a power loom for weaving knotted counterpanes, and later a power loom to weave coach lace and took his brother, Horatio, in with him.