Tuesday, November 3, 2015

दिन विशेष - वासुदेव बळवंत फडके.



१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात ज्यांच्या नावाचा ब्रिटिशांनी, अन्यायी सावकारांनी धसका घेतला होता, ते व्यक्तिमत्त्व म्हणजे वासुदेव बळवंत फडके! दुष्काळाच्या काळात गरिबांची कष्टाची कमाई हिरावून घेणार्‍या सावकार-धनिकांच्या घरांवर झडप घालून, त्यांच्याकडील लुटीचा विनियोग सशस्त्र क्रांतिकार्यासाठी करणारे आद्य क्रांतिकारक म्हणजे वासुदेव बळवंत फडके हे होत.

शिरढोणच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार असलेल्या अनंत रामचंद्र फडके यांच्या मुलाच्या पोटी  वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म झाला. शिरढोणमध्ये त्या वेळी शिक्षणाची सोय नसल्यामुळे वासुदेवराव शिक्षणासाठी कल्याण व नंतर उच्च शिक्षणासाठी मुंबई, पुणे या ठिकाणी राहिले. या काळात त्यांनी इंग्रजीवरही प्रभुत्व मिळवले. पण पुढे नोकरी करण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी अंतिम परीक्षा न देताच शाळा सोडली. याच काळात १८५७ चे स्वातंत्र्यसमर सुरू झाले होते. त्यातील अनेक घटनांचा त्यांच्या मनावर दूरगामी परिणाम होत होता.

फेब्रुवारी,१८६० मध्ये वासुदेवरावांचे लग्न झाले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना नोकरी करणे भाग पडले. म्हणून मुंबईमध्ये प्रथम मिलिटरी अकाउंट्‌स विभागात व त्यानंतर ग्रॅंट मेडिकल कॉलेजात त्यांनी नोकरी केली, पण याच काळात ते अचानकपणे आजारी पडले. त्यांना प्रचंड ज्वराने ग्रासले होते. त्यांना मुंबईची हवा मानवत नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. त्यामुळे पुढे ते पुणे येथे नोकरी करू लागले. ही नोकरी करत असताना, १८६५ साली त्यांना त्यांची आई अंथरुणाला खिळल्याचे कळाले, त्यांनी वरिष्ठांकडे रजेचा अर्ज केला, पण तो त्यांनी नामंजूर केला. तरी आईच्या ओढीने ते आपल्या गावी, शिरढोणला पोहोचले. पण तत्पूर्वीच त्यांच्या आईने या जगाचा निरोप घेतला होता. इथेच त्यांच्या मनात असंतोषाची पहिली ठिणगी पडली. पुढील वर्षी आईच्या वर्षश्राद्धालाही रजा नाकारल्याने उद्विग्न अवस्थेत त्यांनी याचा प्रतिशोध घेण्याचे ठरवले.

दरम्यानच्या काळात न्यायमूर्ती रानडे यांच्या स्वदेशीवरील व्याख्यानाचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव पडला व त्यांच्यातील देशभक्तीचा अंगार अधिकच फुलू लागला. ते स्वदेशीच्या प्रचारासाठी फिरू लागले, व्याख्याने देऊ लागले. याच काळात त्यांनी आपली आध्यात्मिक साधनाही सुरू केली होती. त्यांना काही काळ अक्कलकोट स्वामींचा सहवासही लाभला. स्वदेशप्राप्तीसाठी नुसती भाषणं व व्याख्यानं ही पूरक माध्यमं नसून त्यासाठी बालपणापासूनच विद्यार्थ्यांवर तसे संस्कार होणे गरजेचे आहे, असा विचार करून त्यांनी १८७४ मध्ये पुणे नेटिव्ह इन्स्टिट्यूटची स्थापना केली. यातूनच त्यांनी पुढे पुण्याचे सुप्रसिद्ध भावे विद्यालय सुरू केले. या पद्धतीने राष्ट्रीय शिक्षणाचा पायाच जणू त्यांनी घातला .

दरम्यान महाराष्ट्राला दुष्काळाने घेरले. विहिरी, नद्या, नाले सुकून गेले. गावंच्या गावं ओस पडली. परिस्थिती इतकी विकोपाला गेली की, प्रेतांच्या अंत्यविधीसाठी पैसे नसल्याने कुत्र्या-गिधाडांसाठी प्रेतं ठेवून लोकांना पुढं जावं लागे. यातच देवीच्या साथीची भर पडली आणि इंग्रजांच्या छळालाही सीमा उरली नाही. त्यातूनच पुढे त्यांनी सरकारच्या विरोधात काहीतरी करायचा निर्णय घेतला. या काळात वासुदेवराव लहुजी वस्तादांकडे दांडपट्टा, इतर शस्त्रे, मल्लविद्या व घोडेस्वारी शिकण्यास जात होते. 

या काळातच त्यांनी रामोशी समाजाला संघटित केले. रामोशी जमातीच्या बहुसंख्य लोकांकडे पूर्वी प्रामुख्याने गडरक्षणाचे काम होते. पण गड व किल्ले इंग्रजांनी खालसा केल्यामुळे ते रानोमाळ भटकत असत. या रामोशी समाजाला (तसेच काही भिल्ल लोकांनाही) सोबत घेऊनच त्यांनी सशस्त्र बंडाची तयारी सुरू केली. जे धनिक, सावकार गरिबांचे शोषण करून धनाढ्य झाले होते, त्यांच्याकडून स्वराज्यप्राप्तीसाठी पैसे-परतीच्या बोलीवर- घ्यायचे आणि जर त्यांनी दिले नाहीत, तर ते लुटायचे-अशा मार्गाचा अवलंब करीत त्यांनी आपल्या बंडाचे पहिले निशाण धामारी या गावी २३ फेब्रुवारी, १८७९ रोजी फडकवले. त्यानंतर जवळजवळ ४-५ वर्षे बंडाचे कार्य नियमितपणे -प्रामुख्याने पुणे व सातारा जिल्ह्यात -सुरू होते. या बंडामुळे फडकेंचे नाव लंडनपर्यंत पोहोचले होते. हे बंड करत असताना त्यांनी ब्रिटिशविरोधी जाहीरनामाच प्रसिद्ध केला होता.

त्यांचा बंदोबस्त करण्यासठी सरकारने मेजर डॅनियल याची नेमणूक केली. त्याला वासुदेवरावांनी निम्म्या महाराष्ट्रभर फिरवलं. पुढे त्यांनी गाणगापूर येथे काशीकरबुवा या नावाने काही काळ भूमिगतपणे काम केले. आपली अध्यात्मसाधना सुरूच ठेवली होती. या ठिकाणीच त्यांनी रोहिल्यांना एकत्र करून, त्यांची भाडोत्री सेना घेऊन इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रयत्नही केला. ब्रिटिश त्यांचा पाठलाग हर तर्‍हेने, येथील फितुरांचा, स्थानिक पोलिसांचा आधार घेत करतच होते. वासुदेवरावांनी पोलिसांना अक्षरश: झुंजवले , पण अखेर त्यांना बेळगाव व कोल्हापूर यांच्या मध्ये असलेल्या कदलगी येथे अटक झाली. त्यांना काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी जानेवारी, १८८० मध्ये एडन येथे स्थानबद्ध करण्यात आले.

एडनमध्ये असताना त्यांना पाणी चामड्याच्या पखालीने पुरवले जाई. याविरुद्धही वासुदेवरावांनी आवाज उठवला. त्यानंतर त्यांना कोलू फिरवून २५ पौंड तेल गाळून घेण्याचे काम दिले गेले. अशा अवस्थेतून त्यांची सुटण्याची धडपड सुरू होतीच. त्यातच दि. १२ ऑक्टोबर, १८८० रोजी ते बेड्या तोडून तुरुंगातून पळाले. पण लवकरच त्यांना पुन्हा पकडण्यात आले. त्यानंतर त्यांची रवानगी एकांतवासात झाली. या काळातच त्यांना क्षयरोगानेही ग्रासले. पुढे या आजारात तुरुंगातच त्यांचे दु:खद निधन झाले.

सशस्त्र क्रांतीचा मंत्र देत, बहुजन समाजाला सोबत घेऊन, आपल्या अतुल पराक्रमाने इंग्रजी साम्राज्याला शह देणार्‍या वासुदेवरावांनी जणू शिवछत्रपतींप्रमाणे स्वराज्यप्राप्तीचा यथाशक्ति प्रयत्न केला. यांच्या कार्यातूनच व बलिदानातून असंख्य क्रांतिकारकांनी, स्वातंत्र्यसेनानींनी प्रेरणा घेतली व पुढील काळात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी विविध मार्गांनी प्रयत्न केले.

Friday, October 30, 2015

दिन विशेष - ३१ ऑक्टोबर

सरदार वल्लभभाई पटेल

३१ ऑक्टोबर १८७५ - १५ डिसेंबर १९५०


जन्म व कौटुंबीक जीवन

वल्लभभाई झवेरभाई पटेल याचा जन्म त्यांच्या मामाच्या घरी नडीयाद - गुजरात येथे झाला. त्यांची अचूक जन्मतारिख द्न्यात नाही, त्यांनी मॅट्रीक परीक्षेवेळी स्वतःची जन्म तारीख ३१ ओक्टोबर अशी लिहिली होती. हिंदू धर्मिय पिता झवेरभाई व माता लाडबा यांचे ते चौथे पुत्र होत.

झवेरभाई खेडा जिल्ह्याच्या करमसद गावचे रहिवासी होते. सोमाभाई, नरसिंहभाई व विठ्ठलभाई (विठ्ठलभाई - पुढे राजकारणीही झाले) ही त्यांची मोठी भावंडे होत. त्यांना एक धाकटा भाऊ - काशीभाई व धाकटी बहिण - दहीबा ही होती. बालपणी वल्लभभाई वडिलांना शेतात मदत करत असत. १८ वर्षाचे झाले असता त्यांचे लग्न जवळच्या गावातील १२ / १३ वर्षाच्या झवेरबा यांच्यासोबत झाले.

वल्लभभाई मॅट्रीकची परीक्षा तुलनेने उशिरा म्हणजे २२ वर्षाचे असताना उत्तीर्ण झाले. इतरांकडे पुस्तके मागून, कुटुंबापासून दूर राहून दोन वर्षात वल्लभभाई वकीलीची परिक्षा उत्तीर्ण झाले. यानंतर गोध्रा येथे झवेरबांसोबत त्यांनी गृहस्थ जीवनाची सुरूवात केली. तिथल्या बार कौन्सिलमध्येही नाव नोंदवले. झवेरबांपासून त्यांना दोन अपत्ये झाली - १९०४ मध्ये मणीबेन आणि १९०६ मध्ये डाह्याभाई. गुजरातमध्ये त्या वेळी ब्युबोनिक प्लेगची साथ पसरली होती. या काळात त्यांनी स्वतःच्या कुटुंबास सुरक्षित स्थानी हलवले. वल्लभभाई गोधरा, बोरसद व आणंद भागात वकिली करत असताना करमसदच्या घराची जबाबदारीही बघत होते.

राजकीय जीवन

सरदार वल्लभभाई पटेल (३१ ओक्टोबर १८७५ - १५ डिसेम्बर १९५०) भारत भारताचे एक राजकीय व सामाजिक नेते होते, ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकत्रीकरणात महत्वाचे योगदान दिले. त्यांना 'सरदार' ह्या पदवीने संबोधित केले जाई. ते पेशाने वकील होती. वकीलीच्या काळात ते महात्मा गांधीच्या प्रभावाखाली आले. गुजरातच्या खेडा, बोरसद आणि बारडोली गावाच्या खेडूतांना संघटित करून इंग्रजी अत्याचाराचा प्रतिकार केला. या सत्याग्रहानंतर त्यांची गणना गुजरातच्या प्रभावशाली नेत्यांमध्ये होऊ लागली.

भारतीय राष्ट्रीय कॉग्रेसचे ते एक महत्वाचे नेते होते. १९३४ व १९३७च्या निवडणूकांमध्ये त्यांनी पक्षाचे संघटनही बघितले. भारत छोडो आंदोलनात ते आघाडीवर होते. भारताचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान या रूपात त्यांनी पंजाब व दिल्लीच्या निराश्रितांच्या मदतीसाठी व फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांती पुन:स्थापनेकरिताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी केलेले ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलिनीकरण हे त्यांचे सर्वात महत्वाचे कार्य होय. मुत्सद्दीगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली. ते भारताचे 'लोहपुरूष' म्हणून ओळखले जातात. सरदार, मुक्त व्यापार व मालकी हक्कांचे समर्थक होते.

संधर्भ : विकिपीडिया

Thursday, October 29, 2015

दिन विशेष - ३० ऑक्टोबर




Homi Jehangir Bhabha

Born: 30 October 1909



Homi Jehangir Bhabha (30 October 1909 – 24 January 1966) was an Indian nuclear physicist, founding director, and professor of physics at the Tata Institute of Fundamental Research.Colloquially known as "father of theIndian nuclear programme", Bhabha was the founding director of two well-known research institutions, namely theTata Institute of Fundamental Research (TIFR) and the Trombay Atomic Energy Establishment (now named after him); both sites were the cornerstone of Indian development of nuclear weapons which Bhabha also supervised as its director.



Career

Starting his nuclear physics career in Great Britain, Bhabha had returned to India for his annual vacation before the start of World War II in September 1939. War prompted him to remain in India and accepted a post of reader in physics at the Indian Institute of Science in Bengaluru, headed by Nobel laureate C.V. Raman. During this time, Bhabha played a key role in convincing the Congress Party's senior leaders, most notably Jawaharlal Nehru who later served as India's first Prime Minister, to start the ambitious nuclear programme. As part of this vision, Bhabha established the Cosmic Ray Research Unit at the Institute, began to work on the theory of point particles movement, while independently conducting research on nuclear weapons in 1944. In 1945, he established the Tata Institute of Fundamental Research in Bombay, and the Atomic Energy Commission in 1948, serving as its first chairman. In 1948, Nehru led the appointment of Bhabha as the director of the nuclear program and tasked Bhabha to develop the nuclear weapons soon after. In the 1950s, Bhabha represented India in IAEA conferences, and served as President of the United Nations Conference on the Peaceful Uses of Atomic Energy in Geneva, Switzerland in 1955. During this time, he intensified his lobbying for the development of nuclear weapons. Soon after the Sino-Indo war, Bhabha aggressively and publicly began to call for the nuclear weapons.

Bhabha gained international prominence after deriving a correct expression for the probability of scattering positrons by electrons, a process now known as Bhabha scattering. His major contribution included his work on Compton scattering, R-process, and furthermore the advancement of nuclear physics. He was awarded Padma Bhushan by Government of India in 1954. He later served as the member of the Indian Cabinet's Scientific Advisory Committee and provided the pivotal role to Vikram Sarabhai to set up the Indian National Committee for Space Research. In January 1966, Bhabha died in a plane crash near Mont Blanc, while heading to Vienna, Austria to attend a meeting of the International Atomic Energy Agency's Scientific Advisory Committee.


Research in Nuclear physics

In January 1933, Bhabha received his doctorate in nuclear physics after publishing his first scientific paper, "The Absorption of Cosmic radiation". In the publication, Bhabha offered an explanation of the absorption features and electron shower production in cosmic rays. The paper helped him win the Isaac Newton Studentship in 1934, which he held for the next three years. The following year, he completed his doctoral studies in theoretical physics under Ralph H. Fowler. During his studentship, he split his time working at Cambridge and with Niels Bohr in Copenhagen. In 1935, Bhabha published a paper in the Proceedings of the Royal Society, Series A, in which performed the first calculation to determine the cross section of electron-positron scattering. Electron-positron scattering was later named Bhabha scattering, in honor of his contributions in the field.

In 1936, the two published a paper, "The Passage of Fast Electrons and the Theory of Cosmic Showers" in the Proceedings of the Royal Society, Series A, in which they used their theory to describe how primary cosmic rays from outer space interact with the upper atmosphere to produce particles observed at the ground level. Bhabha and Heitler then made numerical estimates of the number of electrons in the cascade process at different altitudes for different electron initiation energies. The calculations agreed with the experimental observations of cosmic ray showers made by Bruno Rossi and Pierre Victor Auger a few years before. Bhabha later concluded that observations of the properties of such particles would lead to the straightforward experimental verification of Albert Einstein's theory of relativity. In 1937, Bhabha was awarded the Senior Studentship of the 1851 exhibition, which helped him continue his work at Cambridge until the outbreak of World War II in 1939.

Thursday, June 11, 2015

दिन विषेश - १२ जून

पु.ल. देशपांडे

लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक

स्मृतिदिन - १२, इ.स. २०००

पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे (नोव्हेंबर ८, इ.स. १९१९ - जून १२, इ.स. २०००) हे लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथा व पटकथाकार, दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते. त्यांना महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व असे म्हटले जायचे. त्यांच्या आद्याक्षरांवरून महाराष्ट्रात ते प्रेमाने पु. ल. म्हणून ओळखले जातात.

पु.ल.देशपांडे हे शिक्षक, लेखक, नट, नकलाकार, गायक, नाटककार, विनोदकार, कवी, पेटीवादक, संगीत दिग्दर्शक, वक्ते, खवय्ये, आणि रसिक श्रोते असे सर्वगुणसंपन्‍न होते. त्यांनी आपल्या गुणांच्या जोरावर एकपात्री-बहुपात्री नाटक, चित्रपट, नभोवाणी, दूरचित्रवाणी अशा सर्व क्षेत्रांत अनेक आघाड्यांवर यश संपादन केले.

पुरस्कार
विष्णुदास भावे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सांगलीची अखिल भारतीय नाट्य विद्यामंदिर समिती ही इसवी सनाच्या १९६० सालापासून विष्णुदास भावे पुरस्कार देत आली आहे. पु.ल.देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.

Tuesday, April 14, 2015

दिन विशेष - १४ एप्रिल

भीमराव रामजी आंबेडकर

भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार

जन्मदिन : एप्रिल १४, इ.स. १८९१


डॉ. भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ बाबासाहेब आंबेडकर (एप्रिल १४, इ.स. १८९१; महू, मध्य प्रदेश - डिसेंबर ६, इ.स. १९५६; दिल्ली) हे मराठी, भारतीय कायदेतज्ज्ञ व राजकारणी होते. स्वातंत्र्योत्तर काळात भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार होते. [२].[३]./[४] भारतीयांच्या उद्धारासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. इ.स. १९९० साली भारतीय शासनाने त्यांना भारतरत्न या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवले.

सामाजिक आणि आर्थिक अडचणींवर मात करून महाविद्यालयीन पदवी मिळवणाऱ्या दलितांच्या पहिल्या पिढीमधील ते एक होते. नंतर कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांतील अभ्यास व संशोधन यांसाठी त्यांना कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून विविध पदव्या मिळाल्या.

अस्पृश्यतेविरुद्ध संघर्ष

बाबासाहेबांनी एक आघाडीचे भारतीय विद्वान या नात्याने गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९बाबत साऊथबरो कमिटीसमोर आपले विचार मांडले. यावेळी आंबेडकरांनी दलित व इतर मागासलेल्या समाजांसाठी वेगळे मतदान विभाग व आरक्षण यांची मागणी केली. इ.स. १९२० साली त्यांनी मुंबईत मूकनायक नावाचे वृत्तपत्र सुरू केले. या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीचा फायदा घेऊन त्यांनी सनातनी हिंदू नेत्यांवर आणि जातिभेदाविरुद्ध काहीही करत नसलेल्या भारतीय राजकारण्यांवर टीका केली. कोल्हापुरातील मागासवर्गीयांच्या सभेमध्ये त्यांनी केलेल्या भाषणामुळे छत्रपती शाहू महाराज खूश झाले व त्यांनी आंबेडकरांबरोबर जेवण करून हिंदू समाजाला धक्का दिला. आंबेडकरांनी यानंतर वकिलीचा व्यवसाय सुरू केला आणि मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी बहिष्कृत हितकारिणी सभा सुरू केली.

चवदार तळे सत्याग्रह
इ.स. १९२६ साली आंबेडकर मुंबई प्रांतिक विधानपरिषदेचे नेमलेले सदस्य बनले. इ.स. १९२७ च्या सुमारास त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध जागृत चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी व हिंदू देवळांमध्ये प्रवेशासाठी सार्वजनिक चळवळी व मोर्चे काढण्यास सुरुवात केली. महाड येथे चवदार तळे अस्पृश्य समाजासाठी सुरू करण्यासाठी यशस्वी सत्याग्रह केला.

पुरस्कार

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनेक पुरस्कार दिले जातात.त्यांपैकी काही असे:-

दिल्ली येथील भारतीय दलित साहित्य अकादमीतर्फे सामाजिक व राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’
फुले आंबेडकर शाहू विचारमंचाच्या वतीने दिला गेलेला समाजरत्‍न पुरस्कार
बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार(नागपूर)
महाराष्ट्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार

भारतीय राज्यघटनेची उद्देशिका

आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:
सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;
विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा
व उपासना यांचे स्वातंत्र्य;
दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा
व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता
प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;
आमच्या संविधानसभेत
आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजी
याद्वारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमित
करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत.

Monday, April 13, 2015

दिन विशेष - १३ एप्रिल

दत्ताजी ताम्हाणे

एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक

जन्म : रत्नागिरी, १३ एप्रिल, १९१३



दत्ताजी ताम्हणे (जन्म : रत्नागिरी, १३ एप्रिल, १९१३; मृत्यू : मुलुंड (मुंबई), ६ एप्रिल २०१४) हे एक थोर देशभक्त स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे वडील पोस्ट मास्टर होते. त्यांच्या जन्मदिनीच म्हणजे १३ एप्रिल १९१९ या दिवशी जालियनवाला हत्याकांड झाले. त्यामुळे पुढे देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत दत्ताजींनी आपला वाढदिवस साजरा केला नाही.

शालेय वयात असताना दत्ताजी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या देशभक्तिपर कविता म्हणत. अशी एक कविता ऐकून एका पोलीस अधिकाऱ्याने पोस्ट मास्टरची मुले देशद्रोही आहेत, असा रिपोर्ट दिला. तेव्हा एका रात्रीत त्या कवितेच्याच चालीवर राजा पंचम जॉर्जची स्तुती करणारी कविता रचून दत्ताजींच्या वडिलांनी कुटुंबावरील संकट टाळले.

विद्यार्थी दशेतच स्वातंत्र्यप्रेम उफाळून आल्यामुळे १९२८ साली सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याच्या घटनेने त्यांचा राजकारणात प्रवेश झाला. त्यानंतर त्यांनी १९३० साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत मिठाच्या सत्याग्रहासाठी आंदोलन केले.

१९३२मध्ये दत्ताजींनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी कॉलेजात प्रवेश घेतला. पण कॉलेजला रामराम ठोकून त्यांनी १९३४ सालापासून काँग्रेसचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून कार्य करण्यास प्रारंभ केला. १९३६मध्ये फैजपूर येथे भरलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनास दत्ताजींची उपस्थिती होती.

त्यानंतर, स्वामी आनंद यांच्या आश्रमात जवळ जवळ दोन वर्षे दत्ताजींचे वास्तव्य होते. १९४०साली ठाणे जिल्‍ह्यामध्ये वैयक्तिक सत्याग्रह करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली.

छोडो भारत आंदोलनात सहभागी झाल्यामुळे १९४२ साली दत्ताजींना सव्वा दोन वर्षांचा कारावास भोगावा लागला. या आंदोलनात ठाण्याच्या तुरुंगात आणले गेलेले ते पहिले राजबंदी होते.

स्वातंत्र्यानंतर सन १९४८मध्ये दत्ताजींनी समाजवादी पक्षात प्रवेश केला. १९५० ते १९५३पर्यंत समाजवादी पक्षाच्या महाराष्ट्र कार्यालयाचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले.

१९५२साली दत्ताजी ताम्हणे यांनी विधानसभेची निवडणूक लढविली. परंतु ते निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यानंतर संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे १९५७साली विधानसभेवर त्यांची निवड झाली. 1968 मध्ये ते विधान परिषदेवर निवडून गेले.

पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी जाहीर केलेल्या आणीबाणीच्या काळात, १९७५मध्ये १८ महिनेे तुरुंगात राहण्याची पाळी दत्ताजींवर आली.

दत्ताजी ताम्हणे यांनी `लोकमित्र' हे साप्ताहिक संपादित केले. कुळकायद्यावर त्यांनी `कळीचा घोडा' हे पुस्तक लिहिले. त्यास महाराष्ट्र शासनाचा १५०० रुपयांचा पुरस्कार मिळाला. १९६८ साली ताम्हणे लोकसभेसाठी उभे राहिले परंतु त्यांचा पराभव झाला.

१९७६मध्ये दत्ताजी ताम्हणे यांनी ठाणे जिह्यामध्ये जनता पक्षाची स्थापना केली. १९८३साली त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली. यानंतर त्यांनी त्यांचा लेखन वाचन व चिंतन हा छंद आणि समाजकारण व मार्गदर्शन हेच व्रत सांभाळले. ते १०० वर्षांचे झाले तरी त्यांच्या घरी सकाळी १०-१५ माणसे केवळ विविध पुस्तकांचे वाचन करण्यासाठी नित्यनेमाने जमत असत.

दत्ताजी ताम्हणे यांनी लग्न न करता आयुष्यभर देशकारण आणि समाजकारण केले. वयाच्या १०१व्या वर्षी दीड महिन्याच्या आजारपणानंतर त्यांचे मुंबईतील मुलुंडच्या रुग्णालयात निधन झाले.

Friday, April 10, 2015

दिन विशे‍ष - ११ एप्रिल

जोतीराव गोविंदराव फुले

मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक

जन्मदिन - एप्रिल ११, इ.स. १८२७


महात्मा जोतीबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणास प्रोत्साहन देऊन मुहुर्तमेढ रोवली. त्यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा १८४८ साली पुणे येथे भिडेंच्या वाड्यात उघडली. आपल्या पुरोगामी विचारांची निर्भयपणे मांडणी केली व स्वत:चे विचार आचरणात आणले

सप्टेंबर २३, इ.स. १८७३ रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. पुरोहितांकडून होणाऱ्या अन्यायापासून, अत्याचारापासून व गुलामगिरीतून तथाकथित शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.'सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥' हे समाजाचे घोष वाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरी विरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजातर्फे पुरोहिताशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत. -

“ विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।

वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


जोतीरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले पहिले भारतीय होत.


वाचनाची अतिशय आवड असल्यामुळे शिवाजी महाराजांचे चरित्र व थॉमस पेन या विचारवंताच्या ‘राईटस् ऑफ मॅन’ या ग्रंथाचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्रय आणि समाजातील जातिभेद पाहून ते अतिशय अस्वस्थ होत असत. ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा त्यांनी निश्चय केला. त्याप्रमाणे आपल्या पत्नी सावित्रीबाईंना त्यांनी साक्षर केले. १८४८ साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची ही मुहूर्तमेढ ठरली. तसेच अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळपेठेत १८५२ मध्ये त्यांनी शाळा स्थापन केली. त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम असत. समाज सुधारण्याच्या कार्याला गती देण्यासाठी व व्यापक करण्यासाठी १८७३ साली त्यांनी ‘सत्यशोधक समाजा’ची स्थापना केली. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’

मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या ‘शेतकर्याच ा आसूड’ या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्रयाची वास्तवता विशद केली आहे. या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणून ही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्वचितक व्यत्तिमत्त्व म्हणूनही आपल्यासमोर येतात.

सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून 'दीनबंधू' हे साप्ताहिक चालविले जात असे. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला. 'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इ.स. १८९१ मध्ये प्रकाशित झाला.