Thursday, March 26, 2015

दिन विशेष - २७ मार्च

विल्हेम राँटजेन

एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध

जन्मदिन - मार्च २७ १८४५


जीवन
एक्स-रे अर्थात क्ष-किरणांचा शोध लावणारे प्रा. विल्हेम कॉनरॅड राँटजेन यांचा जन्म जर्मनी देशातील लेनेप येथे मार्च २७ १८४५ ला एका शेतकरी कुटुंबात झाला. विल्हेम यांचे वडील हे जर्मन तर आई डच होती. त्यांचे शालेय शिक्षण नेदरलँड्स देशात आणि उच्च शिक्षण स्वित्झर्लंड देशात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी युरोपमधल्या अनेक विश्वविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले.

संशोधन
सन १८८५ साली जर्मनीतल्या वुर्झबर्ग विश्वविद्यालयातल्या प्रयोगशाळेत काम करत असतांना प्रा. राँटजेन यांना क्ष-किरणांचा शोध अचानकपणे लागला. एकदा काही प्रयोग करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत अंधार केला. कॅथॉड रे ट्युब (सी.आर.टी.) वापरून ते त्यांच्या प्रयोगाच्या तयारीला लागले होते. त्या प्रयोगात त्यांनी बेरियम प्लॅटिनो सायनईड वापरले होते. अंधार्‍या खोलीत प्रयोग सुरू असल्याने काही वेळाने प्रा. राँटजेन यांना वेगळ्याच रंगांच्या प्रकाश लहरी चमकतांना दिसल्या शिवाय खोलीच्या काळा पडद्यावरही विचित्र आकृती उमटलेल्या दिसल्या. ते प्रयोग करीत असलेल्या सी. आर. टी. चे तोंड पक्के झाकलेले असूनही भिंतीवरच्या पडद्यावर आकृत्या पाहून त्यांनी त्या अज्ञात किरणांना एक्स असे नाव दिले. या किरणांच्या आरपार जाण्याच्या गुणधर्माचा उपयोग माणसाच्या शरीरातील भाग पाहण्यासाठी होवू शकतो असे प्रा. राँटजेन यांनी सप्रयोग दाखवून दिले.

पुरस्कार
क्ष-किरणांचा उपयोग करून माणसाच्या हाडांच्या विविध समस्यांचा अभ्यास आणि उपाय करणे अत्यंत सुलभ झाले. या अनमोल शोधामुळे प्रा. राँटजेन यांना १९०१ साली भौतिक शास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.

फेब्रुवारी १० १९२३ रोजी प्रा. राँटजेन आणि त्यांचे दोन विद्यार्थी याच क्ष-किरणांच्या घातक मार्‍यामुळे मृत्यु पावले.

Tuesday, March 17, 2015

दिन विशेष - १८ मार्च

शहाजीराजे भोसले

जन्म मार्च १८, इ.स. १५९४


शहाजीराजे भोसले हे पराक्रम, युद्धप्रसंगीची बुद्धिमत्ता, उत्तम प्रशासन, व स्वतंत्र राज्यकारभार या मूलभूत गुण-कौशल्यांचे बीजारोपण शिवाजीराजांमध्ये करणारे ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होते.

जन्म
मालोजी भोसले यांची पत्नी दीपाबाई(उमाबाई)हिच्या पोटी सिंदखेड इथे शहाजी यांचा जन्म १८ मार्च १५९४ रोजी झाला.(शहाजींच्या जन्मतारखेबद्दल इतिहासकारात मतभेद आहेत.) काहींच्या मते मालोजी भासले यांची मुख्य राणी उम्मवा साठे यांची कन्या उमा ही असून तिच्या पोटी शहाजी व शरीफजी यांचा जन्म झाला. तर काहींच्या मते फलटणच्या वणगोजी निंबाळकर यांची कन्या दीपा ह्या शहाजी व शरीफजी यांच्या माता होत.[१]

पार्श्वभूमी
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली.

Monday, March 16, 2015

दिन विशेष - १७ मार्च

कल्पना चावला

भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर

जन्मदिन - मार्च १७ इ.स. १९६२


कल्‍पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होती. कल्‍पना ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.

व्यक्तीगत जीवन
कल्पना सुनील चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा येथे झाला.

शिक्षण
कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातुन १९८२ एरोनोटिकल अभियांत्रिकी पदवी घेऊन त्यांनी १९८४ अर्लिङ्ग्टनच्या टेक्सास विद्यापीठातून एरोनोटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण करून कोलोराडो विद्यापीठातुन एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातुन १९८८ मध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.

कार्य
डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणुन त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनटे प्रवास केला.

मृत्यू
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाश संशोधन क्षेत्राला हादरवून टाकणारी एक घटना घडली. अवकाशातून पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या अंतराळवीरांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या अंतराळवीरांमध्ये कल्पना चावला यांचाही समावेश होता.

दिन विशेष - १६ मार्च

Raymond Vahan Damadian

inventor of the first MR (Magnetic Resonance) Scanning Machine.(MRI)

Born - March 16, 1936


Raymond Vahan Damadian (born March 16, 1936) is an American of Armenian origin, medical practitioner, and inventor of the first MR (Magnetic Resonance) Scanning Machine.[1] His research into sodium and potassium in living cells led him to his first experiments with nuclear magnetic resonance (NMR) which caused him to first propose the MR body scanner in 1969. Damadian discovered that tumors and normal tissue can be distinguished in vivo by nuclear magnetic resonance (NMR) because of their relaxation times, both T1 (spin-lattice relaxation) or T2 (spin-spin relaxation). Damadian was the first to perform a full body scan of a human being in 1977 to diagnose cancer. Damadian invented an apparatus and method to use NMR safely and accurately to scan the human body, a method now well known as magnetic resonance imaging (MRI).[2]


Saturday, March 14, 2015

दिन विशेष - १५ मार्च

संदीप उन्नीकृष्णन

एन.एस.जी. कमांडोचे अधिकारी

जन्मदिन - १५ मार्च इ.स. १९७७

मेजर संदीप उन्नीकृष्णन (- नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे एन.एस.जी. कमांडोचे अधिकारीहोते. नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन यांनी वीरमरण पत्करले. २६ जानेवारी २००९ रोजी त्याला अशोक चक्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचे शेवटचे शब्द म्हणजे : "तुम्ही वर येऊ नका , मी सगळं सांभाळतो." हे शब्द त्यांनी त्यांच्या माणसांना त्यांच्यावर गोळीबार होताना उद्गारले. हे सगळे ताज महाल या हॉटेलमध्य घडले. [म्हणजेच एन.सी.जी. च्या black tornado operation चालू असताना.]

परिवार

संदीप हा इस्त्रोचे निवृत्त ऑफिसर के. उन्नीकृष्णन व धनलक्ष्मी उन्नीकृष्णन यांचा एकुलताएक सुपुत्र होता. त्यांचा परिवार हा आधी बंगळूरू येथे स्थायित होता. परंतु नंतर ते केरळ मध्ये स्थायित झाले.

दिन विशेष - १५ मार्च

संदीप उन्नीकृष्णन

एन.एस.जी. कमांडोचे अधिकारी

जन्मदिन - १५ मार्च इ.स. १९७७

मेजर संदीप उन्नीकृष्णन (- नोव्हेंबर २६, इ.स. २००८:मुंबई) हे एन.एस.जी. कमांडोचे अधिकारीहोते. नोव्हेंबर २६, इ.स. २००८ रोजी मुंबईवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात संदीप उन्नीकृष्णन यांनी वीरमरण पत्करले. २६ जानेवारी २००९ रोजी त्याला अशोक चक्र हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचे शेवटचे शब्द म्हणजे : "तुम्ही वर येऊ नका , मी सगळं सांभाळतो." हे शब्द त्यांनी त्यांच्या माणसांना त्यांच्यावर गोळीबार होताना उद्गारले. हे सगळे ताज महाल या हॉटेलमध्य घडले. [म्हणजेच एन.सी.जी. च्या black tornado operation चालू असताना.]

परिवार

संदीप हा इस्त्रोचे निवृत्त ऑफिसर के. उन्नीकृष्णन व धनलक्ष्मी उन्नीकृष्णन यांचा एकुलताएक सुपुत्र होता. त्यांचा परिवार हा आधी बंगळूरू येथे स्थायित होता. परंतु नंतर ते केरळ मध्ये स्थायित झाले.

Friday, March 13, 2015

दिन विशेष, - १३ मार्च

मार्च १३ १७८१

सर विल्यम हर्षल यांनी युरेनस या ग्रहाचा शोध लावला


युरेनस सूर्यापासून सातव्या क्रमांकाचा ग्रह आहे. तो बराचसा वायूंचा बनलेला आहे. तो व्यासानुसार तिसरा आणि वस्तुमानानुसार चौथा ग्रह आहे. युरेनस ग्रह पृथ्वीच्या तुलनेत अनेक पटींनी मोठा आहे. पृथ्वीपासून त्याचे अंतर २.८ अब्ज कि.मी. आहे. युरेनसला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पुरी करण्यास ८४ वर्ष लागतात. नासाच्या "व्हॉयेजर २" या यानाने युरेनस ग्रहाला भेट दिली आहे. या ग्रहासाठी सध्या तरी कोणत्याही नव्या मोहिमेचा विचार नाही. इ.स. १९७७ साली पृथ्वीवरुन प्रक्षेपित केलेले "व्हॉयेजर २" यान जानेवारी २४ १९८६ या दिवशी युरेनसच्या सर्वांत जवळ पोहोचले. तेथुन ते नेपच्युन ग्रहासाठीच्यात्याच्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.

आधुनिक काळात शोध लागलेला हा पहिला ग्रह आहे. सर विल्यम हर्षल यांनी हा ग्रह मार्च १३ १७८१ ला शोधल्याची घोषणा केली.

युरेनसचा शोध

युरेनस हा पहिला ग्रह आहे की तो प्राचीन काळी माहिती नसला तरी त्याचे निरीक्षण मात्र केले जात होते. पण त्याला तारा म्हणून गणले जाई. विल्यम हर्शेलला सुद्धा तो प्रथम धूमकेतू वाटला होता.

भौतिक गुणधर्म

युरेनस हा प्रामुख्याने वायु व अनेक प्रकारच्या बर्फांसमान बनलेला आहे. याच्या वातावरणात ८३% हायड्रोजन, १५% हेलीयम, २% मिथेन व असिटिलीन चे काही अंश आहेत. तर अंतर्भागात ऑक्सिजन, कार्बन व नायट्रोजन यांची संयुगे तसेच खडकाळ पदार्थ आहेत. त्याचा हा अंर्तभाग गुरु व शनी ग्रहाच्या विरुद्ध आहे जो कि प्रामुख्याने हायड्रोजन व हेलीयमपासून बनलेला आहे.

नैसर्गिक उपग्रह

युरेनसला २७ नैसर्गिक उपग्रह (चंद्र) आहेत. या चंद्रांची नावे ही शेक्सपियर व अलेक्झांडर पोप यांच्या कथानकांमधील पात्रांची नावे आहेत. मिरांडा(Miranda), एरिएल(Ariel), उंब्रिएल(Umbiel), टायटानिया(Titania) आणि ओबेरॉन(Oberon) हे पाच प्रमुख चंद्र आहेत.

Tuesday, March 10, 2015

दिन विशेष, - ११ मार्च

संभाजी भोसले

शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव

स्मृतिदिन - ११ मार्च, इ.स. १६८९



संभाजीराजे भोसले (१४ मे, इ.स. १६५७; पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ११ मार्च, इ.स. १६८९; तुळापूर, महाराष्ट्र) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.

Monday, March 9, 2015

दिन विशेष - १० मार्च

सावित्रीबाई फुले

मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला

स्मृतिदिन - १० मार्च  इ.स. १८९७


सावित्रीबाई फुले (जन्म : नायगाव-सातारा जिल्हा, जानेवारी ३, इ.स. १८३१ - मृत्यू : पुणे, मार्च १०, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिबा फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली.
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सवित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलाविण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली.(यापूर्वी मिशनऱ्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या १४-१५ शाळा उत्तरी भारतात होत्या.) या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीबाई डगमगल्या नाहीत.
शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा-पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनविले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणाऱ्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत.
जोतिरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.

Saturday, March 7, 2015

दिन विशेष - ८ मार्च

८ मार्च

जागतिक महिला दिन

संपूर्ण अमेरिका आणि युरोपसहित जवळजवळ जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नाकारलेला होता. पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री-पुरुष विषमतेचे हे एक ढळढळीत उदाहरण. या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या. १८९० मध्ये अमेरिकेत मतदानाच्या हक्कासंदर्भात `द नॅशनल अमेरिकन सफ्रेजिस्ट असोसिएशन' स्थापन झाली. परंतु ही असोसिएशनसुद्धा वर्णद्वेषी आणि स्थलांतरितांविषयी पूर्वग्रह असणारी होती. दक्षिणेकडील देशांना काळया मतदात्यांपासून आणि उत्तर व पूर्वेकडील देशांना तेथील बहुसंख्य देशांतरित मतदात्यांपासून वाचवण्याकरता स्त्रियांना मतदानाच्या हक्क मिळायलाच हवा, अशा प्रकारचे आवाहन ती करत होती. अर्थात या मर्यादित हक्कांना बहुसंख्य काळया वर्णाच्या आणि देशांतरित कामगार स्त्रियांनी जोरदार विरोध केला आणि क्रांतिकारी मार्क्सवाद्यांनी केलेल्या सार्वत्रिक प्रौढ मतदानाच्या हक्कांच्या मागणीला पाठिंबा दिला. १९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली.
त्यामध्ये क्लारा झेटकिन या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने `सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे.' अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या. या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकिन अतिशय प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्नीय समाजवादी महिला परिषदेत, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा `जागतिक महिला-दिन' म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पसार झाला. यानंतर युरोप, अमेरिका वगैरे देशात सार्वत्रिक मतदानाच्या हक्कासाठी मोहिमा उघडल्या गेल्या. त्यांचा परिणाम म्हणून १९१८ साली इंग्लंडमध्ये व १९१९ साली अमेरिकेत या मागण्यांना यश मिळाले.
भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया `बोलत्या' व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालये तसेच काही काही घरांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे

दिन विशेष - ‌७ ‌‌‌मार्च

Nicéphore Niépce

the inventor of photography

Birthdate - 7 March 1765

Nicéphore Niépce (born Joseph Niépce 7 March 1765 – 5 July 1833)[1] was a French inventor, now usually credited as the inventor of photography and a pioneer in that field.[2] Niépce developed heliography, a technique he used to create the world's oldest surviving product of a photographic process: a print made from a photoengraved printing plate in 1825.[3] In 1826 or 1827, he used a primitive camera to produce the oldest surviving photograph of a real-world scene. Among Niépce's other inventions was the Pyréolophore, the world's first internal combustion engine, which he conceived, created, and developed with his older brother Claude.[4]

Friday, March 6, 2015

दिन विशेष - ६ मार्च

६ मार्च १८६९

दिमित्री मेन्डेलीफने मूलभूत घटकपदार्थांची आवर्त सारणी प्रकाशित केली.

आवर्त सारणी (इंग्लिश: Periodic Table, पिरियॉडिक टेबल) ही रासायनिक मूलद्रव्यांना तक्त्याच्या रूपात दर्शवण्याची एक पद्धत आहे. मूलद्रव्यांना कोष्टकरूपात दाखवण्याच्या काही पद्धती जुन्या काळी प्रचलित होत्या (उदा. डोबेरायनरची त्रिके, न्यूलँडची अष्टके). या पद्धतींद्वारे केली जाणारी मांडणी सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करता येत नसे.

इ.स. १८६९ साली रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव याने प्रथम ही आवर्त सारणी आधुनिक पद्धतीने मांडली. मेंडेलीवने मूलद्रव्यांना त्यांच्या अणु-वस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडले. त्यानंतर मेंडेलीवने मूलद्रव्यांची आडव्या ओळीत मांडणी करण्यास सुरूवात केली. जर त्याला आधी मांडलेल्या मूलद्रव्याशी साधर्म्य असलेले दुसरे मूलद्रव्य सापडले, तर ते त्याने नवीन ओळीत पहिल्या मूलद्रव्याच्या खाली मांडले. मेंडेलीवला अश्या सारणीतून मूलद्रव्यांच्या गुणधर्मांमधील आवर्तानुसारी कल ठळकपणे दाखवायचे होते. काळागणिक जसजशी नव्या मूलद्रव्यांची भर पडत गेली, तसतशी मेंडेलीवच्या मूळ सारणीची रचना वाढत वाढत बदलली गेली.

मेंडेलीवची आवर्त सारणी जरी तत्कालीन ज्ञात मूलद्रव्यांची मांडणी करण्यात यशस्वी ठरली, तरी कालांतराने, तिच्यामधील काही त्रुटी समोर आल्यात. उदा. एकाच मूलद्रव्याची विविध अणु-वस्तुमान असलेली समस्थानिके मेंडेलीवच्या आवर्त सारणीत विविध जागा घेतील, परंतु असे करणे अयोग्य आहे, कारण सगळ्या समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म सारखेच असतात.

आधुनिक आवर्त सारणी
इ.स. १९१३ मध्ये हेनरी मोस्ले या ब्रिटिश शास्त्रज्ञाने असे शोधून काढले की, अणुवस्तुमान हा मूलद्रव्यांचा मूलभूत गुणधर्म नसून, तो अणुअंक हा आहे. मोस्लेने मेंडेलीवच्या सारणीत अणुअंकानुसार मूलद्रव्यांची फेरमांडणी केली आणि आज वापरली जाणारी आधुनिक आवर्तसारणी तयार केली.

Thursday, March 5, 2015

दिन विशेष - ५ मार्च

जेरार्डस मर्केटर

एक फ्लेमिश नकाशाकार

जन्मदिन - ५ मार्च, इ.स. १५१२

जेरार्डस मर्केटर (मराठी नामभेद: गेरहार्ड मर्केटर; रोमन लिपी: Gerardus Mercator) (५ मार्च, इ.स. १५१२ - २ डिसेंबर, इ.स. १५९४) हा एक फ्लेमिश नकाशाकार होता. जगाचा पहिला नकाशा बनवण्याचे श्रेय त्याच्याकडे जाते.

कामगिरी

गेरहार्ड मर्केटर याने इ.स. १५४१ साली पृथ्वीचा पहिला गोल तयार केला. इ.स. १५५४ साली गेरहार्ड मर्केटरने युरोपचा मोठा नकाशा तयार केला. इ.स. १५६९ साली त्याने संपूर्ण जगाचा नकाशा बनवला. मर्केटरने नकाशा बनवताना त्यात समांतर रेषांचा वापर केला होता त्यामुळे दोन्ही दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवाकडे रेखांशातील अंतर वाढत गेल्याने होणारा फरक भरुन काढण्यासाठी मर्केटरने त्या प्रदेशातील अक्षवृत्तांमधील अंतरही वाढवले. त्यामुळे नकाशातील प्रदेशांचे क्षेत्र जरी बदलले असले तरी दिशा आणि आकार यात काहीही फरक पडला नाही आणि मर्केटरच्या नकाशात अधिक अचूकता आली.

Tuesday, March 3, 2015

दिन विशेष -- ४ मार्च

Why we are celebrating 4th march national safety day?"

After the independence, there was rapid industrialization in our country, which also resulted in increase in number of accidents. At that time, there was no such body for guiding the industries on safety

In view of the rising trend of industrial accidents in the country, the labour minister's conference in its 22nd session 1962 recommended that "a conference on safety in factories should be convened and the question of setting up the National Safety Council for conducting a campaign on accident prevention should be considered." 

The recommendation of the conference was approved by the 24th session of the standing labour committee, which met on 13th to 14th February 1966 at New Delhi under the chairmanship of late shri Jagjivan Ram (at that time he was union minister), and the proposal concerning the constitution of National Safety Council (NSC) was set up on 4th March 1966 by the ministry.

 Subsequently, it was decided that this day, 4th March, should be commemorated as National Safety Day every year in the form of National awareness campaign. Since 1972 the National Safety Day is celebrated every year throughout the country to reiterate the importance of safety and create an awareness campaign throughout the country.

दिन विशेष - ३ मार्च

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल
दूरध्वनी यंत्राचा शोध लावला
जन्मदिन - ३ मार्च १८४७
अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल (३ मार्च १८४७, २ ऑगस्ट १९२२) यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.
बालपण
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात तरी वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने पुढे ते ओळखले जाऊ लागले.
मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील होते. त्यासाठी बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमण्यात आले. तेथेच बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. मग बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे कोडे उलगडले.
कार्य
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसऱ्या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी सांगितले. बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी अर्ज दाखल केला. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना दूरध्वनी यंत्राचे पेटंट मिळाले.
योगदान
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या यंत्राचे प्रयोग अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून ओळखली जावू लागली.
दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीट बंद ठेवण्यात आले.
उल्लेखनीय
विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला तसेच आपल्याजवळील पैसा लावून हे नियतकालिक आठ वर्षे सतत सुरू ठेवले. पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.
१८९८ ते १९०४ या काळात बेल नॅशनल जिओग्राफिक सोसायटीचे अध्यक्ष होते.