कल्पना चावला
भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर
जन्मदिन - मार्च १७ इ.स. १९६२
कल्पना चावला (मार्च १७ इ.स. १९६२:कर्नाल, हरयाणा -- फेब्रुवारी १ इ.स. २००३:टेक्सासवर अंतराळात) ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होती. कल्पना ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती.
व्यक्तीगत जीवन
कल्पना सुनील चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा येथे झाला.
शिक्षण
कल्पना चावला यांचे शालेय शिक्षण टागोर बाल निकेतन विद्यालयात झाले. पंजाब विद्यापीठातुन १९८२ एरोनोटिकल अभियांत्रिकी पदवी घेऊन त्यांनी १९८४ अर्लिङ्ग्टनच्या टेक्सास विद्यापीठातून एरोनोटिकल उच्च अभियांत्रिकी शिक्षण करून कोलोराडो विद्यापीठातुन एरोस्पेस अभियांत्रिकी विभागातुन १९८८ मध्ये डॉक्टरेट पदवी प्राप्त केली.
कार्य
डिसेंबर १९९४ साली चावला यांची अमेरिकेतील नासामध्ये १५व्या अंतराळवीर समूहात निवड झाली. मिशन विशेषज्ञ म्हणुन त्यांनी एसटीएस-८७ वर काम केले. अवकाशात त्यांनी ३७६ तास व ३४ मिनटे प्रवास केला.
मृत्यू
१ फेब्रुवारी २००३ या दिवशी अवकाश संशोधन क्षेत्राला हादरवून टाकणारी एक घटना घडली. अवकाशातून पृथ्वीवर परत येणाऱ्या कोलंबिया अवकाशयानाचा स्फोट झाला. या स्फोटामुळे कोलंबियाचे अक्षरश: तुकडे तुकडे झाले. या यानामध्ये असलेल्या अंतराळवीरांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. या अंतराळवीरांमध्ये कल्पना चावला यांचाही समावेश होता.
No comments:
Post a Comment