Tuesday, March 10, 2015

दिन विशेष, - ११ मार्च

संभाजी भोसले

शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव

स्मृतिदिन - ११ मार्च, इ.स. १६८९



संभाजीराजे भोसले (१४ मे, इ.स. १६५७; पुरंदर किल्ला, पुणे जिल्हा, महाराष्ट्र - ११ मार्च, इ.स. १६८९; तुळापूर, महाराष्ट्र) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले चिरंजीव आणि मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती होते.

संभाजीराजांचा जन्म १४ मे, इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराजांसारख्या युगपुरुषाचे पुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आईचे, सईबाईंचे निधन राजे अगदी लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळील कापूरहोळ गावची धाराऊ नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजीचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाई यांनी केला. सुरुवातीच्या काळात त्यांच्या सावत्र आई, सोयराबाई यांनीदेखील त्यांच्यावर खूप माया केली.

इ.स. १६७४ मध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला तोपर्यंत संभाजीराजे राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचांमध्ये तरबेज झाले होते. त्यांच्या विनम्र स्वभावाने राज्याभिषेकासाठी रायगडावर आलेल्या प्रतिनिधींना जिंकून घेतले.

No comments:

Post a Comment